भजनी मालिका
← भजनांकडे परत

कैंचि याला बाईल आई । नामरुपें तेंही लटिकेंचि

kainchi yala bail ai | namarupen tenhi latikenchi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कैंचि याला बाईल आई । नामरुपें तेंही लटिकेंचि ॥१॥ मूळचि नाहीं डाळ तें कैंचे । लटिकें साचें काय म्हणों ॥२॥ हात पाय नाक ना डोळे । देखणें आंधळें नातळेचि निळा म्हणे कांहींचि नव्हे । तोचि हा अवघे श्रुति बोले ॥३॥