भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोठें वसे झाडाचिवरी । कोठें पोखरीं विवरांत

kothen vase jhadachivari | kothen pokharin vivarant

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कोठें वसे झाडाचिवरी । कोठें पोखरीं विवरांत ॥१॥ कोठें जळीं वसे स्थळीं । कोठे अंतराळी अंतरिक्ष ॥२॥ कोठें पर्वतीं दरकुटीआंत । कोठें वनांत झाडखंडीं ॥३॥ निळा म्हणे चिखलीं शेणीं । वसे पाषाणीं काष्ठांत ॥४॥