भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोणाचीहि न धरुनी आशा । भजावें जगदीशा कीर्तनें

konachihi na dharuni asha | bhajaven jagadisha kirtanen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कोणाचीहि न धरुनी आशा । भजावें जगदीशा कीर्तनें ॥१॥ मग तो कृपेचा सागर । उतरील पार भवसिंधू ॥२॥ तोडूनियां ममता जाळ । करील कृपाळ वरी कृपा ॥३॥ निळा म्हणे आवडी त्यासी । कीर्तनापाशी तिष्ठतु ॥४॥