भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोठें फावो येतां मग । निश्चळ ऐसा हा प्रसंग

kothen phavo yetan mag | nishchal aisa ha prasang

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कोठें फावो येतां मग । निश्चळ ऐसा हा प्रसंग ॥१॥ आजि संतसंगगुणें । हरिचीं नामें उच्चारणें ॥२॥ अनायासेंचि कथा कीर्ति । जोडली याचि संगती ॥३॥ निळा म्हणे फळोन्मुख । झालें परमार्थिक सुख ॥४॥