देह पडे तंव देहाचा अभिमान । परि न करी अज्ञान आत्महित
deh pade tanv dehacha abhiman | pari na kari adnyan atmahit
देह पडे तंव देहाचा अभिमान । परि न करी अज्ञान आत्महित ॥१॥ मी माझें म्हणतां गेले नेणों किती । रंक चक्रवर्ति असंख्यात ॥२॥
विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.
deh pade tanv dehacha abhiman | pari na kari adnyan atmahit
देह पडे तंव देहाचा अभिमान । परि न करी अज्ञान आत्महित ॥१॥ मी माझें म्हणतां गेले नेणों किती । रंक चक्रवर्ति असंख्यात ॥२॥
deh mandirabhitarin | sheje sudala shrihari | nidra unmaniche bhari | ten myan svapna dekhilen
देह मंदिराभीतरीं । शेजे सूदला श्रीहरी । निद्रा उन्मनीचे भरी । तें म्यां स्वप्न देखिलें ॥१॥ स्वप्नीं भुललें बाई । मागील नाठवेचि कांहीं । हा जीव परवस्तूच्या ठायीं । तनुमने आटला ॥२॥
dehadharma vihit kari | dvaitabhav chittim na dhari
देहधर्म विहित करी । द्वैतभाव चित्तीम न धरी । सर्वाभूती नमस्कारी । एक आत्मा म्हणोनियां ॥१॥
dehabhav pran jay | tevhan hen dhairya sukh hoy
देहभाव प्राण जाय । तेव्हां हें धैर्य सुख होय ॥१॥ तया निद्रे जे निजले । भाव जागृती नाहीं आलें ॥२॥
dehabhav sarva jay | tevhan videhi sukh hoy
देहभाव सर्व जाय । तेव्हां विदेही सुख होय ॥१॥ तया निद्रें जे पहुडले । भवजागृति नाहीं आले ॥२॥
dehasamay antin ishtamitra milati | sambhala mhanati mulen majhin
देहसमय अंतीं इष्टमित्र मिळती । सांभाळा म्हणती मुलें माझीं ॥१॥ स्त्री धनधान्य ते निरवुनी जात । आपुलें स्वहित विचारीना ॥२॥
dehacha palat vithobache bheti | jal lavana ganthin padon theli
देहाचा पालट विठोबाचे भेटी । जळ लवणा गांठीं पडोन ठेली ॥१॥ धन्य मायबाप नामदेव माझा । तेणें पंढरिराजा दाखविलें ॥२॥
dehachen mamatva nahin jon tutalen | vishayin kitalen man nahin
देहाचें ममत्व नाहीं जों तुटलें । विषयीं किटलें मन नाहीं ॥१॥ तंव नित्य सुख कैसेंनि आतुडे । नेणती बापुडे प्रेमसुख ॥२॥
dehuda charan vahatuse venu | gopikaramanu svami majha
देहुडा चरण वाहातुसे वेणु । गोपिकारमणु स्वामि माझा ॥१॥ देखिलागे माय यमुनेचे तीरीं । हात खांद्यावरी राधि-केच्या ॥२॥
daitya raja thor maha balivant | jagin to vikhyat hiranyakashyap
दैत्य राजा थोर महा बळिवंत । जगीं तो विख्यात हिरण्यकश्यप ॥१॥ करुनियां तप तोषवी ब्रम्हाया । मागे वर तया दैत्यराव ॥२॥
dondil dondil tamakat chale | gojirin paulen ghale:-niyan
दोंदील दोंदील टमकत चाले । गोजिरीं पाउलें घाले:-नियां ॥१॥ पायीं रुणझुण रुणझुणिती वाळे । गोपी पाहतां डोळे मन निवे ॥२॥
don prahar ratra pahoni ekant | rajai vruttant sange mate
दोन प्रहर रात्र पाहोनी एकांत । राजाई वृत्तांत सांगे माते ॥१॥ अहो रखुमाबाई विठोबासि सांगा । भ्रतारासि कां गा वेडें केलें ॥२॥
donhi joduni kar matha thevi charanin | mhane parisa vinavani svami majhi
दोन्ही जोडुनि कर माथा ठेवी चरणीं । म्हणे परिसा विनवणी स्वामी माझी ॥१॥ मी तंव अज्ञान न कळे तुमचा महिमा । अपराध क्षमा करा माझा ॥२॥
donhi hat thevuni kadan | ubha bhivarechya thadan
दोन्ही हात ठेवूनि कडां । उभा भिवरेच्या थडां ॥१॥ हरि बरवया बरवया । विठोबा पंढरीच्या राया ॥२॥
dohikade dohi jaya | madhyen gorobachi shayya
दोहीकडे दोही जाया । मध्यें गोरोबाची शय्या ॥१॥ गोरा निद्रिस्थ असतां । कपट करिती त्याच्या कांता ॥२॥
dravya dyavayasi | nand gela mathuresi
द्रव्य द्यावयासी । नंद गेला मथुरेसी ॥१॥ तेथें भेटे वसुदेव । पुसे सुखी आहां सर्व ॥२॥
draupadikaran | pathirakha narayan
द्रौपदीकारण । पाठीराखा नारायण ॥१॥ गोरा कुंभाराच्यासंगें । चिखल तुडवूं लागे अंगें ॥२॥
draupadichen thalipatra | tyant kainche shakhapatra
द्रौपदीचें थालीपात्र । त्यांत कैंचे शाखापत्र ॥१॥ माव याची अभिन्नव । वाव मानसीं उपाव ॥२॥
dvaparinchi thev sampurna pahun | vinavi jodun kara-lagin
द्वापारींची ठेव संपूर्ण पाहून । विनवी जोडून करा-लागीं ॥१॥ रामरूप धरून मज बोळवावें । तें रूप राहावें ह्लदया-माजी ॥२॥
dvarakechya raya | buddhi dega nam gaya
द्वारकेच्या राया । बुद्धि देगा नाम गाया ॥१॥ मतिमंद तुझी दासी । ठाव देईं चरणांपासीं ॥२॥