भजनी मालिका
← भजनांकडे परत

दोन प्रहर रात्र पाहोनी एकांत । राजाई वृत्तांत सांगे माते

don prahar ratra pahoni ekant | rajai vruttant sange mate

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दोन प्रहर रात्र पाहोनी एकांत । राजाई वृत्तांत सांगे माते ॥१॥ अहो रखुमाबाई विठोबासि सांगा । भ्रतारासि कां गा वेडें केलें ॥२॥ वस्त्र पात्र नाहीं खाया जेवयासी । नाचे अहर्निशीं निर्लज्जसा ॥३॥ चवदा मनुष्यें आहेत माझ्या घरीं । हिंडती दारोदारीं अन्नासाठीं ॥४॥ बरा मार्ग तुम्ही उमजोनि सांगा । नामयाची राजा भली नव्हे ॥५॥