भजनी मालिका
← भजनांकडे परत

अखंड जयाला देवाचा शेजार । कां रे अहंकार नाहीं गेला

akhand jayala devacha shejar | kan re ahankar nahin gela

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अखंड जयाला देवाचा शेजार । कां रे अहंकार नाहीं गेला ॥१॥ मान अपमान वाढविसी हेवा । दिवस असतां दिवा हातीं घेसी ॥२॥ परब्रह्मासंगें नित्य तुझा खेळ । आंधळे पां डोळे कां बा जाले ॥३॥ कल्पतरुतळवटीं इच्छिली ते गोष्टी । अद्यापि नरोटी राहिली कां ॥४॥ घरीं कामधेनु ताक मागूं जाय । ऐसा द्वाड आहे जगामाजीं ॥५॥ म्हणे मुक्ताबाई जाई दरुषणा । आधीं अभिमाना दूर करा ॥६॥