भजनी मालिका
← भजनांकडे परत

अकरा लोचन त्याचे पांच मुख । आठ कान देख पुच्छ दोन

akara lochan tyache panch mukh | ath kan dekh puchchha don

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अकरा लोचन त्याचे पांच मुख । आठ कान देख पुच्छ दोन ॥१॥ अरत अखंड निरत प्रचंड । उमाळ उदंड उभा फार ॥२॥ दहा पाय चहूं चालत ते जाय । नव्हेत ग माय सावज त्या ॥३॥ नामा म्हणे त्याचा अर्थ करीं चोख । पूर्वज पातक लया जाय ॥४॥