भजनी मालिका
← भजनांकडे परत

अखंड मुखीं रामनाम । धन्य तयाचाचि जन्म

akhand mukhin ramanam | dhanya tayachachi janma

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अखंड मुखीं रामनाम । धन्य तयाचाचि जन्म । स्नान संध्येसी नेम । तो पुरुष महापवित्र ॥१॥ धन्य धन्य तयाचा जन्म । रामार्पण अवघें कर्म । तोचि तरला हाचि नेम । रामकृष्ण उच्चारणीं ॥२॥ अनंत जन्माचे सांकडें । तेणेंचि उगविलें कोडें । जप तप येणें नावडे । रामकृष्ण उच्चारनीं ॥३॥ नामा म्हणे नाममात्रें । अवघीं निवारलीं शस्त्रें । रामकृष्ण नाम वक्त्रें । उच्चारी तो धन्य ॥४॥