भजनी मालिका
← भजनांकडे परत

अक्रुराच्या घरा आले रामकृष्ण । संतोषलें मन फार त्याचें

akrurachya ghara ale ramakrushna | santoshalen man phar tyachen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अक्रुराच्या घरा आले रामकृष्ण । संतोषलें मन फार त्याचें ॥१॥ घालेनि आसन प्रक्षाळी चरण । ह्मणे धन्य दीन आजीचा हा ॥२॥ जोडिनियां हात घाली नमस्कार । जाहला उद्धार पूर्वजांचा ॥३॥ हस्तनापुरासि अक्रूरा त्वां जावें । सांगितलें देवे नामा ह्मणे ॥४॥