भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्रौपदीकारण । पाठीराखा नारायण

draupadikaran | pathirakha narayan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
द्रौपदीकारण । पाठीराखा नारायण ॥१॥ गोरा कुंभाराच्यासंगें । चिखल तुडवूं लागे अंगें ॥२॥ कविसच्या वैसोनि पाठीं । शेले विणितां सांगे गोष्टी ॥३॥ चोखामेळ्यासाठीं । ढोरें ओढी जगजेठी ॥४॥ जनीसंगें दळूं लागे । सुरवर म्हणती धन्य भाग्यें ॥५॥