भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह पडे तंव देहाचा अभिमान । परि न करी अज्ञान आत्महित

deh pade tanv dehacha abhiman | pari na kari adnyan atmahit

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देह पडे तंव देहाचा अभिमान । परि न करी अज्ञान आत्महित ॥१॥ मी माझें म्हणतां गेले नेणों किती । रंक चक्रवर्ति असंख्यात ॥२॥ क्षणक्षणा देह आयुष्य पैं काटे । वासना ते वाढे नित्य नवी ॥३॥ मोहाचीं सोयरीं मिळालीं चोरटीं । खाऊनि शेवटीं घर घेती ॥४॥ जोंवरी संपत्ति तंववरी हे सखें । गेलीया तें भुंके सुणें जैसें ॥५॥ नामा म्हणे केशवा मी तों तुझा दास । मज आहे विश्वास तुझ्या नामीं ॥६॥