भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

होता प्रात:काळ सांगतसे तया । जावें येथोनियां शीघ्र आतां ॥१॥ क्षणोक्षणा पाहाती देवाजीचें मुख । येती सक-ळीक गोकुळासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

होसि भक्तांचा कोंवसा । तुझीं ब्रीदें ह्लषिकेशा । निव-विलें सायासा । कृपासिंधु मुरारी ॥१॥ अंबरुषिकारणें । दहा वेळ गर्भवासा येणें । अवतार धरिला नारायणें । गजापूर नगरीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ह्मणे पुंडलीक देवा शिरोमणी । परिसावी विनवणी एक माझी ॥१॥ संसारबंधन तोडींरे दारुण । हें एक मागणें तुजपाशीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

उठा उठा साधुसंत । साधा आपुलें हित । गेला गेला हा नरदेह । मग कैंचा भगवंत ॥ध्रु०॥ उठुनी वेगेशीं चला जाऊं राउळाशी । जळती पातकाच्या राशी । काकड आरती देखिलिया ॥१॥

उठा उठा प्रभात जाहली । चिंता श्रीविठ्ठ्ल माउली । दीन जनांची साउली । येई धांउनी स्मरतांचि ॥१॥ पंढरपुरीं जे भिमातटीं । सुंदर मनोहर गोमटी । दोन्ही कर ठेविनियां कटीं । भेटीसाठीं तिष्ठतसे ॥२॥

उठा जागे व्हारे आतां । स्मरण करा पंढरिनाथा । भावें चरणीं ठेवा माथा । चुकवी व्यथा जन्माच्या ॥१॥ धन दारा पुत्रजन । बंधु सोयरे पिशून । सर्व मिथ्या हे जाणून । शरण रिघा देवासी ॥२॥

उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां । झाला अरुणोदय सरली निद्रेचीवेळा ॥१॥ संत साधु मुनि अवघे झालेती गोळा । सोडा शेजेसुख आतां पाहूंद्या मुखकमळा ॥२॥

लाजलें गे माय आतां कोणा ओवाळूं । जिकडे पाहावें तिकडे चतुर्भुज गोपाळू ॥१॥ ओवाळूं मी गेलें माय गेले द्वारके । जिकडे पहावें तिकडे चतुर्भुज सारिखें ॥२॥

अवताराची राशी तो हा उभा विटेवरी । शंख चक्र- गदापद्मसहित करीं ॥१॥ देखिला देखिला देवा आदिदेव बरवा । समाधान जीवा पाहतां वाटे गे माये ॥२॥

येतियां पुसे जातियां धाडी निरोप । पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥१॥ येंई विठाबाई आई माउलीये । निढळावरी कर ठेऊनि पालवीये ॥२॥

बाबा अहंकार निशीं घनदाट । गुरु वचनीं फुटली पहाट । माता भक्ति भेटली बरवंट । तिनें मार्ग दविला चोखटगा ॥१॥ नरहरि रामा गोविंदा वासुदेवा ॥ध्रु०॥