भजनी मालिका
← भजनांकडे परत

ह्मणे पुंडलीक देवा शिरोमणी । परिसावी विनवणी एक माझी

hmane pundalik deva shiromani | parisavi vinavani ek majhi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ह्मणे पुंडलीक देवा शिरोमणी । परिसावी विनवणी एक माझी ॥१॥ संसारबंधन तोडींरे दारुण । हें एक मागणें तुजपाशीं ॥२॥ ऋद्धि सिद्धि मोक्ष संपत्ति विलास । सांडियेली आस त्यांची जीवें ॥३॥ पंच महापातकी विश्वासघातकी । त्यांसी यमादिकीं गांजियलें ॥४॥ ऐसिया पतीत करींरे सनाथ । पुरवीं माझें आर्त पंढरिराया ॥५॥ हेंचि माझें काज अंतरींचें गुज । उद्धरीं सहज सहज महादोषी ॥६॥ नामा ह्मणे वर दिला नारायणें । विठठलदर्शनें मोक्ष जीवा ॥७॥