भजनी मालिका
← भजनांकडे परत

उठा जागे व्हारे आतां

utha jage vhare atan

उठा जागे व्हारे आतां । स्मरण करा पंढरिनाथा । भावें चरणीं ठेवा माथा । चुकवी व्यथा जन्माच्या ॥१॥ धन दारा पुत्रजन । बंधु सोयरे पिशून । सर्व मिथ्या हे जाणून । शरण रिघा देवासी ॥२॥ मायाविन्घें भ्रमलां खरे । म्हणतां मी मायेनि घरें । हें तों संपत्तीचें वारें । साचोकारें जाईल ॥३॥ आयुष्य जात आहे पहा । काळ जपतसे महा । खहिताचा घोर वहा । ध्यानीं रहा श्रीहरीच्या ॥४॥ संत चरणीं भाव धरा । क्षणक्षणा नाम स्मरा । मुक्ति सायोज्यता वरा । हेंचि करा बापांनों ॥५॥ विष्णुदास विनबी नामा । भूलूं नका भवकामा । धरा अंतरीं निज प्रेमा । न चुका नेमा हरिभक्ति ॥६॥