भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

सुखाचा सोहळा वाटतसे जीवा । भेटणें केशवालागीं आजी ॥१॥ पाउलां पाउलीं याचिया वाटे । पताकांचे थाट दिसताती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सुखाचें सुखरूप घेउनी जा तरी । विठ्ठल नामें भरी तिन्ही लोक ॥१॥ आशापाश याही वासना पोखी । विठ्ठलनामा शेखीं घेऊनी राहे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सुखाचे सोयरे भेटती अंतरीं । बाहेरी भितरीं दिधलें क्षेम ॥१॥ सुखाची गवसणी घालोनियां मना । विठ्ठलीं वासना बोल्हावली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सुखालागीं जरी करिसी तळमळ । तरी तूं पंढरिसी जाय एक वेळ ॥१॥ तेथें अवघाची सुखरूप होसी । जन्मोंजन्मींचे श्रम विसरसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सुखालागें मन तुझें गिवसित तळमळी । परि सुख आहे जवळी नकळे तुज ॥१॥ दर्पणीं दीप्ति कीं दुग्धीं घृतशक्ति । परि करणीविण हातीं न लभेची जाण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सुंदर नारायण गौरविले फार । केला नमस्कार वैष्णवांनीं ॥१॥ सुरस सर्व तीर्थें आदि पुरातन । केली नारायणें तीर्थयात्रा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सुदामा ब्राह्मण होता तो दुर्बळ । परि चित्तीं गोपाळ द्दढ धरिला ॥१॥ तयाचें चरित्र ऐका सावधान । तेणें जन्ममरण दूर होती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सुलभ सोपारें नाम केशवाचें । आठविताम वाचे दोष जाती ॥१॥ अनाथाचा सखा उभा नामापासीं । ऐसा तो प्रेमासी भुललासे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सुवर्ण आणि परिमळ । हिरा आणि कोमळ । योगी आणि निर्मळ । हें दुर्लभ जी दातारा ॥१॥ देव जरी बोलता । तरी कल्पतरु चालता । गज जरी दुभता । हें दुर्लभ जी दातारा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सुवर्णाचा शोभे मस्तकीं मुगुट । हीर्रे घनदाट तयावरी ॥१॥ विस्तीर्ण कपाळ व्यंकटा भृकुटीं । टिळक लल्लाटीं केशराचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सुवर्णाचें ताट वोगरुनी परिकर । रुक्माईनेम सत्वर आणियेलें ॥१॥ कनक कळस घेऊनि सत्यभामा आली । आपोशन घाली देवराया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सूर्यवंशीं राजा असे तो श्रीयाळ । पंच वरुषीं बाळ चिलया त्यासी ॥१॥ पतिव्रता कांता नाम तें चांगुणा । अतिता भोजन घाली नित्य ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सेज सिद्ध झाली निजा धीधरा । आज्ञा द्यावी लोकां जाती आपुल्या घरा ॥१॥ रात्र बहुत जाहाली देवा चला मंदिरा । राईरखुमाबाई वाट पाहाती सुंदर ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सोंगाचें वैराग्य अनर्थ हें मूळ । आशा तें केवळ मिथ्या जाण ॥१॥ अंतरापासूनि नसतां विवेक । निभ्रांत चकट आशावटी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

सोडीं कान्हा रवि दोर मथित्या देतें । बया मज तें दे आई मज तें दे डेरां घुमघुमतें ॥१॥ यशोदा उचलोनी कडे त्यासी घेउनी । दाविती चित्रशाळेतें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव