भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुदामा ब्राह्मण होता तो दुर्बळ । परि चित्तीं गोपाळ द्दढ धरिला

sudama brahman hota to durbal | pari chittin gopal ddadh dharila

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सुदामा ब्राह्मण होता तो दुर्बळ । परि चित्तीं गोपाळ द्दढ धरिला ॥१॥ तयाचें चरित्र ऐका सावधान । तेणें जन्ममरण दूर होती ॥२॥ सत्वाचा सागर धैर्याच मांदार । भक्तीचा निर्धार तयापाशीं ॥३॥ हालेना चालेना चळेना ढळेना । आणिक कल्पीना इच्छा कांहीं ॥४॥ सदा सर्वकाळ समाधी लागला । प्रपंच सांडिला छेदूनियां ॥५॥ नामा म्हणे तोचि योगियांचा राजा । ज्ञान्याचीया पूजा पुजतसे ॥६॥