भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखाचा सोहळा वाटतसे जीवा । भेटणें केशवालागीं आजी

sukhacha sohala vatatase jiva | bhetanen keshavalagin aji

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सुखाचा सोहळा वाटतसे जीवा । भेटणें केशवालागीं आजी ॥१॥ पाउलां पाउलीं याचिया वाटे । पताकांचे थाट दिसताती ॥२॥ पैल तो कळसू पाहे पां साजणी । नामघोष कानीं पडतसे ॥३॥ नामा म्हणे नामीं पारणें जो करी । तयासि श्रीहरी उपेक्षिना ॥४॥