भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुखाचें सुखरूप घेउनी जा तरी । विठ्ठल नामें भरी तिन्ही लोक

sukhachen sukharup gheuni ja tari | viththal namen bhari tinhi lok

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सुखाचें सुखरूप घेउनी जा तरी । विठ्ठल नामें भरी तिन्ही लोक ॥१॥ आशापाश याही वासना पोखी । विठ्ठलनामा शेखीं घेऊनी राहे ॥२॥ न लगती सायास करणें काया क्लेश । आपण वैकुंठ येईल सवें ॥३॥ नाठवी संसार नाठवी देहभाव । रोहिणीची माव नकळे काय ॥४॥ कुल्लाळकुसरीं भ्रमत चक्र । आयुष्या आवर्त मापा करीं ॥५॥ खेचर विसा म्हणे येथुनी काढिलें । तें तुज दिधलें जा रे नाम्या ॥६॥