हस्तक ठेविला माथया । ज्ञानदेवा लागे पायां
hastak thevila mathaya | dnyanadeva lage payan
हस्तक ठेविला माथया । ज्ञानदेवा लागे पायां । विठोजी म्हणे लवलाह्या । समाधीस बैसावें ॥१॥
विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.
hastak thevila mathaya | dnyanadeva lage payan
हस्तक ठेविला माथया । ज्ञानदेवा लागे पायां । विठोजी म्हणे लवलाह्या । समाधीस बैसावें ॥१॥
hastichya charanavari baise mashi | naman tayasi karavaya
हस्तीच्या चरणावरी बैसे माशी । नमन तयासी करावया ॥१॥ तैसें कायसें मी केवढें वापुडें । लागे कोणीकडे देवराया ॥२॥
ha dinavatsal maharaj | janasaven kay kay
हा दीनवत्सल महाराज । जनासवें काय काय ॥१॥ तुझी नाहीं केली सेवा । दु:ख वाटे माझ्या जिवा ॥२॥
hat kari amhi athavade mulinche | pandharapuriche varakari
हाट करी आम्ही आठवडे मुळींचे । पंढरपुरीचे वारकरी ॥१॥ खेप ठिकाणाची वस्तु सवंगाची । सवाई निढळाची उणी नव्हे ॥२॥
hatakar kunabi vata modi | rikama bramhan karito chahadi
हाटकर कुणबी वाटा मोडी । रिकामा ब्राम्हण करितो चहाडी ॥१॥ गुळेंविण शिंपी बोटें चाटी । प्रेमेंविण तेली क्षेम दे लाटी ॥२॥
hatin jayachi tantadi | nama hota pail thadi
हाटीं जायाचि तांतडी । नामा होता पैल थडी ॥१॥ म्हणे जा गे आणा त्यासी । नाहीं तरी मी उपवासी ॥२॥
hat nidhalavari thevuni | vat pahen chakrapani
हात निढळावरी ठेवुनी । वाट पाहें चक्रपाणी ॥१॥ धांव धांव पांडुरंगे । सखे जिवलगे अंतरंगे ॥२॥
hat pay sarva miloniyan mela | chala pahun dolan hmanatati
हात पाय सर्व मिळोनियां मेळा । चला पाहूं डोळां ह्मणताती ॥१॥ देखणें तें नव्हे देखतील कैसें । देखण्याची असे सर्व डोळां ॥२॥
hatant naroti jirna vastra bhar | mhanasi savadagar sant majhe
हातांत नरोटी जीर्ण वस्त्र भार । म्हणसी सवदागर संत माझे ॥१॥ परळ भोपळा गृहामाजी संपत्ति । भूषण कां श्रीपती सांगतसां ॥२॥
hatin vina mukhin hari | gayen raulabhitarinj
हातीं विणा मुखीं हरी । गायें राउळाभीतरींज ॥१॥ अन्न उदक सोडिलें । ध्यान देवाचें लागलें ॥२॥
hansoni sopanen khunavilya khuna | namadeva pahuna ala ase
हांसोनि सोपानें खुणाविल्या खुणा । नामदेवा पाहुणा आला असे ॥१॥ तयासी हो पाक पाहिजे पवित्र । भाजलें कीं कोरें कळों नेदी ॥२॥
hansoni pandharinath pahe namyakade | mhane naval kevadhen bhagya tujhen
हांसोनी पंढरिनाथ पाहे नाम्याकडे । म्हणे नवल केवढें भाग्य तुझें ॥१॥ प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ति ज्ञानेश्वर । करीतसे आदर संगतीचा ॥२॥
hindatan shramalon bahu shram jhala | ajuni majhi tula karuna naye
हिंडतां श्रमलों बहु श्रम झाला । अजूनि माझी तुला करुणा नये ॥१॥ मज काय देतां होईल तुझें उणें । किती होसी कृपण पांडुरंगा ॥२॥
hire jalamadhin bhijatil kadhin | taisen krupanidhi kelen amhan
हिरे जळामधीं भिजतील कधीं । तैसें कृपानिधी केलें आम्हां ॥१॥ आमुचा विकल्प आमुचा विकल्प । आमुचा विकल्प आम्हां नाडी ॥२॥
humbarichya mishen hututu khelati | gadayanshin shripati sarvakal
हुंबरीच्या मिषें हुतुतु खेळती । गडयांशीं श्रीपति सर्वकाळ ॥१॥ कळंबाचे झाडाखालीं कुंकमाचे सदे । गोपाळा पवाडे दावीतसे ॥२॥
hen ge ayushya hatohatin gelen | angin adalalen janma-maran
हें गे आयुष्य हातोहातीं गेलें । आंगीं आदळलें जन्म-मरण ॥१॥ कांरे निजसुरा दैवहत मना । आपुली सूचना न करिसी ॥२॥
henchi amhan shreshtha bolile paranishtha | asatan durghat pari sevya
हेंचि आम्हां श्रेष्ठ बोलिले परनिष्ठ । असतां दुर्घट परी सेव्य ॥१॥ पांडवांचें कुळ शोधितां निर्मळ । कुंड जार गोळ बुद्धिकांसी ॥२॥
henchi devanchen bhajan | sada rahe samadhan
हेंचि देवांचें भजन । सदा राहे समाधान ॥१॥ येर अवघे संसारिक । इंद्र देव ब्रम्हादिक ॥२॥
houni haran rahila te vanin | doghi tya harini sriya jhalya
होऊनि हरण राहिला ते वनीं । दोघी त्या हरिणी स्रिया झाल्या ॥१॥ जातीच्या स्वभावें करिती विहार । चित्त झालें स्थिर एकमेकां ॥२॥
houniyan tuhmi vaninchin vanacharen | bolatasan phar dharma-dharma
होऊनियां तुह्मी वनींचीं वनचरें । बोलतसां फार धर्मा-धर्म ॥१॥ येणें कांहीं कांहीं द्रव आला मना । तुमची भावना कोण जाणे ॥२॥