भजनी मालिका
← भजनांकडे परत

हातीं विणा मुखीं हरी । गायें राउळाभीतरींज

hatin vina mukhin hari | gayen raulabhitarinj

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हातीं विणा मुखीं हरी । गायें राउळाभीतरींज ॥१॥ अन्न उदक सोडिलें । ध्यान देवाचें लागलें ॥२॥ स्त्री पुत्र बाप माय । यांचा आठव न होय ॥३॥ देह्भाव विसरला । छंद हरीच लागला ॥४॥ नामा म्हणे हेंचि देई । तुझे पाय माझे डोयीं ॥५॥