भजनी मालिका
← भजनांकडे परत

हस्तक ठेविला माथया । ज्ञानदेवा लागे पायां

hastak thevila mathaya | dnyanadeva lage payan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हस्तक ठेविला माथया । ज्ञानदेवा लागे पायां । विठोजी म्हणे लवलाह्या । समाधीस बैसावें ॥१॥ इंद्र चंद्र देव येती । ब्रह्मादिक गीती गाती । यमवरुणबृहस्पति । विमानें दाटतें अंतरिक्षीं ॥२॥ तंव पातले गरुडदेव । रुक्मणी सत्यभामा भाव । राही माता गोपी सर्व । समाधि ज्ञानदेव पहावया ॥३॥ ब्रह्मैंद्रप्रजापति । सर्व अंतरिक्षीं पाहती । आळंकापुरीं ये श्रीपती । हरुष चित्तीं ज्ञानदेवा ॥४॥ रुषिमुनी गणगंधर्व । पिशाच-गुह्यक सर्व । धृव-अंबऋषि माधव । चित्तीं भाव पहावया ॥५॥ ऐसी दाटलीं विमानें । संतीं जाणितलें ज्ञानें । ज्ञानदेव ब्रह्म होणें । हें विदान विठठलाचें ॥६॥ जयजय शब्दें ध्वनि गर्जे । तेणें स्वर्गमृत्युपाताळ गाजे । पाताळीं शेष म्हणे भुंजे । प्रेमें फुंजे न समाये ॥७॥ नामा म्हणे शिवादिक । सिद्धेश्वरीं मिळाले सकळिक । पाहाती विठठलकौतुक । ज्ञानदेव समाधीचें ॥८॥