भजनी मालिका
← भजनांकडे परत

हात निढळावरी ठेवुनी । वाट पाहें चक्रपाणी

hat nidhalavari thevuni | vat pahen chakrapani

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हात निढळावरी ठेवुनी । वाट पाहें चक्रपाणी ॥१॥ धांव धांव पांडुरंगे । सखे जिवलगे अंतरंगे ॥२॥ तुजबांचूनि दाही दिशा । वाट पाहातें जगदीशा ॥३॥ हांसें करूं नको जनासी । म्हणे नामयाची दासी ॥४॥