भजनी मालिका
← भजनांकडे परत

हा दीनवत्सल महाराज । जनासवें काय काय

ha dinavatsal maharaj | janasaven kay kay

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हा दीनवत्सल महाराज । जनासवें काय काय ॥१॥ तुझी नाहीं केली सेवा । दु:ख वाटे माझ्या जिवा ॥२॥ रात्रंदिवस मजपाशीं । दळूं कांडूं तूं लागसी ॥३॥ जें जें दु:ख झालें मला । तें तें सोसिलें विठ्ठला ॥४॥ क्षमा कीजे पंढरिराया । दासी जनी लागे पायां ॥५॥