भजनी मालिका
← भजनांकडे परत

हाटकर कुणबी वाटा मोडी । रिकामा ब्राम्हण करितो चहाडी

hatakar kunabi vata modi | rikama bramhan karito chahadi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हाटकर कुणबी वाटा मोडी । रिकामा ब्राम्हण करितो चहाडी ॥१॥ गुळेंविण शिंपी बोटें चाटी । प्रेमेंविण तेली क्षेम दे लाटी ॥२॥ जिताचि कोष्टी घातला खाचे । प्रेमेंविण कुंभार नाचे ॥३॥ लोहार हिंवाविण तापे । सोनारा लागले धापे ॥४॥ नामा म्हणे यातिचे चाळे । दुखणेंविण परीट विवळे ॥५॥