भजनी मालिका
← भजनांकडे परत

हात पाय सर्व मिळोनियां मेळा । चला पाहूं डोळां ह्मणताती

hat pay sarva miloniyan mela | chala pahun dolan hmanatati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हात पाय सर्व मिळोनियां मेळा । चला पाहूं डोळां ह्मणताती ॥१॥ देखणें तें नव्हे देखतील कैसें । देखण्याची असे सर्व डोळां ॥२॥ चंचुभूत अंश अशांत मिळाली । निर्गुणाची खोली देव जाणे ॥३॥ नामा ह्मणे तेव्हां तुज पाहों आला । पाहोनि तो ठेला सर्वांभूतीं ॥४॥