भजनी मालिका
← भजनांकडे परत

होऊनियां तुह्मी वनींचीं वनचरें । बोलतसां फार धर्मा-धर्म

houniyan tuhmi vaninchin vanacharen | bolatasan phar dharma-dharma

रचनाकार: संत नामदेव · अभंग
होऊनियां तुह्मी वनींचीं वनचरें । बोलतसां फार धर्मा-धर्म ॥१॥ येणें कांहीं कांहीं द्रव आला मना । तुमची भावना कोण जाणे ॥२॥ सोडिल्या पाण्यासी ठकवूनि आम्हासी । गेलिया तु-ह्मांसी काय कीजे ॥३॥ नामा ह्मणे ऐसें बोलेनि किरात । करावया घात शस्त्र काढी ॥४॥