भजनी मालिका
← भजनांकडे परत

हाट करी आम्ही आठवडे मुळींचे । पंढरपुरीचे वारकरी

hat kari amhi athavade mulinche | pandharapuriche varakari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
हाट करी आम्ही आठवडे मुळींचे । पंढरपुरीचे वारकरी ॥१॥ खेप ठिकाणाची वस्तु सवंगाची । सवाई निढळाची उणी नव्हे ॥२॥ चोहाटा चौकाचा दुकान नाक्याचा । जागा मिराशीचा पुरातन ॥३॥ हरिनाम केणें नित्य हमेशाई । तेव्हां तोटा नाहीं कोणें काळीं ॥४॥ विठा म्हणे वजन केली वैकुंठीची । गुणी निर्गुणींची कडासन ॥५॥