भजनी मालिका
← भजनांकडे परत

सेज सिद्ध झाली निजा धीधरा । आज्ञा द्यावी लोकां जाती आपुल्या घरा

sej siddha jhali nija dhidhara | adnya dyavi lokan jati apulya ghara

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सेज सिद्ध झाली निजा धीधरा । आज्ञा द्यावी लोकां जाती आपुल्या घरा ॥१॥ रात्र बहुत जाहाली देवा चला मंदिरा । राईरखुमाबाई वाट पाहाती सुंदर ॥२॥ तुम्हासमोरा देवा झाली पंढरी । विनटला चरणीं गोंदा उभा राहिला द्वारीं ॥३॥