भजनी मालिका
← भजनांकडे परत

सुवर्णाचें ताट वोगरुनी परिकर । रुक्माईनेम सत्वर आणियेलें

suvarnachen tat vogaruni parikar | rukmainem satvar aniyelen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सुवर्णाचें ताट वोगरुनी परिकर । रुक्माईनेम सत्वर आणियेलें ॥१॥ कनक कळस घेऊनि सत्यभामा आली । आपोशन घाली देवराया ॥२॥ सुखाचा सुरतरु भक्त चिंतामणी । पुरवितो आयणी निजभक्ताची ॥३॥ तेथे उद्धव अक्रुर नारद तुंबर । आणिक अपार भक्त येती ॥४॥ महाद्वारीं होतां उभा नामा ठेला । तो जवळी बोलाविला केशिराजें ॥५॥ देवाचा वोरसु देखोनी गौरव । देहीं देहभाव विसरला ॥६॥ निजबोध निवृत्ति राहिली निवांत । ह्रदयीं वोसंडित प्रेमरसें ॥७॥ देखोनी पंढरीनथ धाविन्नला वेगीं । जैसी वत्सालागीं तान्हें धेनू ॥८॥ उचलोनि चहूंभुजी दिलें आलिंगन । आणिलें उमजून देहावरी ॥९॥ धरोनि बाहुवटीं बैसविला ताटीं । स्फुंदताम हिंपुटी होत असे ॥१०॥ कुर्वाळोनि माथा घास घाली मुखीं । तंव तो परलक्षी तन्मय होतु ॥११॥ अंतरीचें गुज बोले कृपासिंधु । करुनि सावधु नामयासी ॥१२॥ म्हणे जिवलगा बोलें सुख गोष्टी । आर्त आहे पोटीं बहु दिवसांचें ॥१३॥ अंतरीचें सुख बाहेरी तूं पाहे । गगना काय आहे पाठीपोट ॥१४॥ तैसा तूं आनंदु आहे पै निर्मळ । चिद्रूप केवळ सदोदित ॥१५॥ तुझें तेंचि माझें माझें तेंचि तुझें । आहे सहजीम सहजें एकविध ॥१६॥ परतोनियां दृष्टि घाली मजवरी । मी तो निरंतरीं तूंचि होसी ॥१७॥ हा तुझा सोहळा पाहें उघडा डोळां । मी तुज जवळां ज्ञानदीपू ॥१८॥ आर्त तुझिये भेटी आले भक्तराणे । सुखाचें पारणें करवी त्यांसी ॥१९॥ परमानंद मूर्ति धन्य हा निर्वृत्ति । सुखाचा सांगाती ज्ञानदेव ॥२०॥ पवित्र हा सोपान परलोकींचें तारुं । करी याचा आदरु भाग्यवंता ॥२१॥ म्हणोनि पंढरीनाथें आश्वासिलें करें । मिठी दिली येरें चरणकमळीं ॥२२॥ नामा म्हणे तुझे कृपेचा वोल्हावा । विश्रांति या जिवा जाली असे ॥२३॥