भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोडीं सोडीं मिठीं । लपवा लपवा जगजेठी

sodin sodin mithin | lapava lapava jagajethi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
सोडीं सोडीं मिठीं । लपवा लपवा जगजेठी ॥१॥ झणीं कंसासी कळेल । माझ्या बाळासी मारील ॥२॥ वासुदेव चिंता मनीं । तेज न माये गगनीं ॥३॥ नामा ह्मणे आलें हासें । देव तेव्हां सांगतसे ॥४॥