भजनी मालिका
← भजनांकडे परत

झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा

jhani drushti lago tujhya sagunapana

झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा । जेणे माझ्या मना बोध केला ।।१।। अनंत जन्मींचे विसरलो दुःख । पाहतां तुझे मुख पांडुरंगा ।।२।। योगियांच्या ध्यानी ध्याता नातुडसी । तो तू आम्हांपाशी मागें पुढें ।।३।। नामा म्हणे जीवें करीन निंबलोण । विटेसहित चरण ओवाळीन ।।४।।