भजनी मालिका
← भजनांकडे परत

उठा उठा साधुसंत

utha utha sadhusant

उठा उठा साधुसंत । साधा आपुलें हित । गेला गेला हा नरदेह । मग कैंचा भगवंत ॥ध्रु०॥ उठुनी वेगेशीं चला जाऊं राउळाशी । जळती पातकाच्या राशी । काकड आरती देखिलिया ॥१॥ उठोनियां पहांटे । बिठ्ठल पहा उभा विटे । चरण तयाचे गोमटे । अमृत द्दष्टि अक्लोका ॥२॥ जागें करा रुक्मिणीवरा । देव आहे निदसुरा । वेगें लिंबलोण करा । द्दष्ट होईंल तयासी ॥३॥ पुढें वाजंत्रें वाजती । ढोल दमामे मर्जती । होते काकड आरती । पांडुरंगरायाची ॥४॥ सिंहनाद शंख भेरी । गजर होतो महाद्वारीं । केशवराज विटेवरी । नामा चरण वंदितो ॥५॥