भजनी मालिका
← भजनांकडे परत

उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां

utha panduranga atan darshan dya sakalan

उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळां । झाला अरुणोदय सरली निद्रेचीवेळा ॥१॥ संत साधु मुनि अवघे झालेती गोळा । सोडा शेजेसुख आतां पाहूंद्या मुखकमळा ॥२॥ रंगमंडपीं महाद्वारीं झालीसे दाटी । मन उतावेळ रूप पहावया द्दष्टीं ॥३॥ राई रखुमाबाई तुम्हां येऊंद्या दया । शेजें हालउनी जागें करा देवराया ॥४॥ गरुड हनुमंत उभे पहाती वाट । स्वर्गींचे सुरवर घेउनी आले बोभाट ॥५॥ झालें मुक्तद्वार लाभ झाला रोकडा । विष्णुदास नामा उभा घेऊनि काकडा ॥६॥