भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहभाव प्राण जाय । तेव्हां हें धैर्य सुख होय

dehabhav pran jay | tevhan hen dhairya sukh hoy

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देहभाव प्राण जाय । तेव्हां हें धैर्य सुख होय ॥१॥ तया निद्रे जे निजले । भाव जागृती नाहीं आलें ॥२॥ ऐसी विश्रांति लाधली । आनंद कळा संचरली ॥३॥ तेथें सर्वांग सुखी झालें । लिंगदेह विस्रलें ॥४॥ त्या एकी एक होता । दासी जनी नाहीं आतां ॥५॥