भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्रौपदीचें थालीपात्र । त्यांत कैंचे शाखापत्र

draupadichen thalipatra | tyant kainche shakhapatra

रचनाकार: संत नामदेव · अभंग
द्रौपदीचें थालीपात्र । त्यांत कैंचे शाखापत्र ॥१॥ माव याची अभिन्नव । वाव मानसीं उपाव ॥२॥ जंव लाधला तो आपण । केलें तृप्त त्रिभुवन ॥३॥ सेवा घेउनी सारी काम । अंगें चैतन्य निष्काम ॥४॥ याच्या छळें आकर्षिला । बळिचा द्वारपाळ झाला ॥५॥ भक्तियोगें द्वेषेंभयें । वेघ लाउनी सन्मुख होये ॥६॥ दोही बाही आपण देव । काय नेणा पंढरिराव ॥७॥ दास विठा म्हणे धंदा । कृपा देवाची सपादा ॥८॥