भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

देवा पांडुरंगा वासुदेवा हरी । गोविंद मुरारी नारा-यणा ॥१॥ नारायणा कृष्णा कमळलोचना । माधवा प्रद्युम्ना रावणारी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवा पाप छळें कांपते मेदिनी । षट्‍कर्में ब्राह्मणीं सांडियेलीं । दैत्यांचेनि भारें दाटली अवनी । प्रथम चरणीं कलि-युगीं ॥१॥ लटिक्याचा साच जिंकियेला कली । पाखांडी वेदातें न मानिती बळी । अधर्म प्रवर्तला महीतळीं । ऐसीं पापें कळीं थोर झालीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवा माझें मन आणि तुझे चरण । एकत्र करोन दिधली गांठी ॥१॥ होणार तें हो गा सुखें पंढरीनाथा । कासया शिणतां वायांविण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवा माझें मन करोनि स्वाधीन । निमोले स्वामीपण भोगिसीना ॥१॥ फुकाचा कामारा वोळगे निरंतर । न घाली तुज भार कल्पनेचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवा माझें मन ठेवीं तुझे चरणीं । घालीं माझें नयनीं रूप तुझें ॥१॥ मज या लोकांचा शीण असे मनांत । तुजचि चिंतित ह्रदयकमळीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवाचे अंचळीं उठिला गजर । विठ्ठलनामें अंबर गर्जतसे ॥१॥ संत समुदाय पताकांचे भार । लोटले गजर ऐकावया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवाचे हे आत्मे जाणावे संत । त्यांचे पदीं रत सर्वभावें ॥१॥ श्रीहरीची भेटी सहजचि होय । श्रम लया जाय जाला आधीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवाचें हें गुज सकळ मंत्रमय । जें कां नित्य ध्येय शंकराचें ॥१॥ तें हें रामनाम सेवितां सर्वभावेम । रामरुप व्हावें निश्चयेंसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवाधिदेवा सर्वत्रांच्या जीवा । ऐकें वासुदेवा दया-निधी ॥१॥ ब्रह्मा आणि इंद्र वंद्य सदाशिवा । ऐकें वासुदेवा दीन-बंधू ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवावरी पाये ठेउनि खेंचर । निजेला परिकर निवांतचि ॥१॥ देखोनियां नामा पावला विस्मया । कैसा हा प्राणिया देवो नेणें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवीं देवेश शिवीं शिवेश । अगम्य सुरस आदिमाया ॥१॥ अष्टदिशा अगोचरें अष्टभुजा संहारकरें । असुरादि मंथन विरे कुलस्वामिनीये ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवें समाधान केलें अवघेजण । चला आचमना गौतमीसी ॥१॥ वद्य त्रयोदशी दिधली समाधी । महोत्सव गोविंदीं समर्पिला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवो देवो बोले तूम जीवन भातें । मेहुडें दुभतेम जना यया ॥१॥ तैसें मना करा भजनभाव धरा । विषयपसारा टाका वेगीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवो म्हणती रुक्मिणी । हा येचि युगीं देखिला नयनीं । हेंचि ज्ञानसंजीवनी । जाण त्रैलोक्यासीम ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

देशीं परदेशीं जालों तुजविण । माझें समाधान कोण करी ॥१॥ चातक चकोरापरी पाहे वास । तूं कां गे उदास पांडुरंगे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देह आहे तंव करारे धांवणी । शरण चक्रपाणी रिघा वेगीं ॥१॥ येर ते लटिके इष्टमित्र सखें । हे तंव पारीखे सर्व चोर ॥२॥

रचनाकार: संत नामदेव