भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवा माझें मन ठेवीं तुझे चरणीं । घालीं माझें नयनीं रूप तुझें

deva majhen man thevin tujhe charanin | ghalin majhen nayanin rup tujhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवा माझें मन ठेवीं तुझे चरणीं । घालीं माझें नयनीं रूप तुझें ॥१॥ मज या लोकांचा शीण असे मनांत । तुजचि चिंतित ह्रदयकमळीं ॥२॥ चंदनाच्या दृतीं वेधले तरूवर । सबाह्य अभ्यंतर काय जालें ॥३॥ सरिता सिंधुमाजी मिळोनि लपाली । सागरची जाली एकसरें ॥४॥ लवण जळाचें प्रसिद्धचि असे । ऐक्यभावें वसे न दिसे कांहीं ॥५॥ नामा म्हणे शरण आलों केशिराजा । ऐसा भावो माझा करी वेगीं ॥६॥