भजनी मालिका
← भजनांकडे परत

देशीं परदेशीं जालों तुजविण । माझें समाधान कोण करी

deshin paradeshin jalon tujavin | majhen samadhan kon kari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देशीं परदेशीं जालों तुजविण । माझें समाधान कोण करी ॥१॥ चातक चकोरापरी पाहे वास । तूं कां गे उदास पांडुरंगे ॥२॥ नामा म्हणे चित्त देईं माझ्या बोला । जीउ हा उरला तो निघों पाहे ॥३॥