भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवाधिदेवा सर्वत्रांच्या जीवा । ऐकें वासुदेवा दया-निधी

devadhideva sarvatranchya jiva | aiken vasudeva daya-nidhi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देवाधिदेवा सर्वत्रांच्या जीवा । ऐकें वासुदेवा दया-निधी ॥१॥ ब्रह्मा आणि इंद्र वंद्य सदाशिवा । ऐकें वासुदेवा दीन-बंधू ॥२॥ चवडा लोकपाळ करिती तुझी सेवा । ऐकें वासुदेवा कृपासिंधू ॥३॥ योगियांचे ध्यानीं नातुडसी देवा । ऐकें वासुदेवा जगद्नुरु ॥४॥ निर्गुण निराकार नाहीं तुज माया । ऐकें कृष्णराया कानडीया ॥५॥ वेडा अविचारी करी मजवर दया । ऐकें कृष्ण-राया शहाणिया ॥६॥ करुणेचा पर्जन्य शिंपी मजवरता या । ऐकें कृष्णराया गोजीरिया ॥७॥ नामा ह्मणे जरी दाविसील पाया । तरी वदावया स्फूर्ति चाले ॥८॥