भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्वापारींची ठेव संपूर्ण पाहून । विनवी जोडून करा-लागीं

dvaparinchi thev sampurna pahun | vinavi jodun kara-lagin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
द्वापारींची ठेव संपूर्ण पाहून । विनवी जोडून करा-लागीं ॥१॥ रामरूप धरून मज बोळवावें । तें रूप राहावें ह्लदया-माजी ॥२॥ मनोरथ ऐकोनी श्रवणीं । झाला चापपाणी तात्कालीक ॥३॥ पाहोनियां ध्यान करूनि नमन । निघाला तेथून वायुसुत ॥४॥ घेवोनियां आज्ञा सेतुबांधा गेला । ध्यानस्थ बैसला नामा ह्मणे ॥५॥