भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्रव्य द्यावयासी । नंद गेला मथुरेसी

dravya dyavayasi | nand gela mathuresi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
द्रव्य द्यावयासी । नंद गेला मथुरेसी ॥१॥ तेथें भेटे वसुदेव । पुसे सुखी आहां सर्व ॥२॥ कंसावे मानसीं । घात इच्छी गोकुळासी ॥३॥ जांई जांई त्वरित । होती गोकुळीं आघात ॥४॥ नामा ह्मणे ऐसें सांगे । नंद तेथुनिया निघे ॥५॥