भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहसमय अंतीं इष्टमित्र मिळती । सांभाळा म्हणती मुलें माझीं

dehasamay antin ishtamitra milati | sambhala mhanati mulen majhin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देहसमय अंतीं इष्टमित्र मिळती । सांभाळा म्हणती मुलें माझीं ॥१॥ स्त्री धनधान्य ते निरवुनी जात । आपुलें स्वहित विचारीना ॥२॥ गाडे घोडे म्हौसी सेवक आणि दासी । सांडोनियां जासी एकलाची ॥३॥ मी कोणरे काय कसा आलों येथें । हित कीं अनहित करोनी जातों ॥४॥ हें तंव सूचेना नाठवे ज्याच्या मना । जुंपिलें तें घाणा चौर्‍यांसींच्या ॥५॥ विठा म्हणे तया कोण सोडविता । वेगीं पंढरिनाथा शरण जावें ॥६॥