दीपकळिकेमाजीं कळा । तैसा परब्रह्मा पुतळा
dipakalikemajin kala | taisa parabrahma putala
दीपकळिकेमाजीं कळा । तैसा परब्रह्मा पुतळा ॥१॥ असोनियां नसे जगीं । जैसा प्राणवायु संगीं ॥२॥
सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.
dipakalikemajin kala | taisa parabrahma putala
दीपकळिकेमाजीं कळा । तैसा परब्रह्मा पुतळा ॥१॥ असोनियां नसे जगीं । जैसा प्राणवायु संगीं ॥२॥
dipakache thayin nahin dvaitabhav | chor ani sav sarakhachi
दीपकाचे ठायीं नाहीं द्वैतभाव । चोर आणि साव सारखाची ॥१॥ तैसं ब्रह्माज्ञान । सांगताती गोष्टी । अभाविका पोटीं स्थिर नोहे ॥२॥
dipachiya angasanga | kon sukh ahe patanga
दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ॥१॥ दीपा रूपाचेनि कोडें । पतंग स्नेहांत उडी पडे ॥२॥
dipanchen ten tej kaliken grasile | uday asta thele prabhevin
दीपांचें तें तेज कळिकें ग्रासिले । उदय अस्त ठेले प्रभेविण ॥१॥ लोपलीसे प्रभा तेजाचे तेजस । जाहली समरस दीपज्योती ॥२॥
duhkhachiya bhogi kodi | rasana godi badhak
दुःखाचिया भोगी कोडी । रसना गोडी बाधक ॥१॥ पाहतां रस उत्तम दिसत । भीतरीं रोगाचें गळ गुप्त ॥२॥
duhkhachya khadakin adalati prani | pari sansaracha manin vit naye
दुःखाच्या खडकीं आदळती प्राणी । परि संसाराचा मनीं वीट नये ॥१॥ कामाचिया लाटे कर्दमाचे पुरीं । बुडे तरी हाव धरी अधिकाराची ॥२॥
duja chhand nohe vache | vade sachen harinam
दुजा छंद नोहे वाचे । वदे साचें हरिनाम ॥१॥ कोटी कुळें होती पावन । नामस्मरण करितांची ॥२॥
duja nahinjaya bhav | avagha dev viththal
दुजा नाहींजया भाव । अवघा देव विठ्ठल ॥१॥ आणिक कांहीं नाहीं चंद्र । नाम गोविंद सर्वदा ॥२॥
dujiyachi ninda nako re karun mana | chinti ya charan santachiya
दुजियाची निंदा नको रे करूं मना । चिंती या चरण संताचिया ॥१॥ होउनी उदास गाई सदा नामक । बैसोनि निष्काम एकान्तासी ॥२॥
duji yeuni pudhen bole aiken vo bai | ghusalan ghusalitan deran phodila pahin
दुजी येऊनी पुढें बोले ऐकें वो बाई । घुसळण घुसळितां डेरां फोडिला पाहीं ॥१॥ धांवुनि आलीं सासु मारितसें मजला । हांसतसे आपण तेथोनि पळाला ॥२॥
dujepani drushti na ghalun | sarva chalu ek satta
दुजेपणी दृष्टी न घालुं । सर्वा चालु एक सत्ता ॥१॥ हाचि पुर्वीचा संकल्प । निर्विकल्प नाम जपूं ॥२॥
dujepanen nako pahun sarvathayin | ekarup dehin dise
दुजेपणें नको पाहुं सर्वाठायीं । एकरुप देहीं दिसे ॥१॥ येणें सर्व काम सुगम सोपारें । दुजेपंणे वावरे देहबुद्धी ॥२॥
dujempanen pahe tari devache charan | ani ten kirtan vaishnavanchen
दुजेंपणें पाहे तरी देवाचे चरण । आणि तें कीर्तन वैष्णवांचें ॥१॥ कीर्तनीं नाचती हरिदास प्रेमें । दुजेपणा नेमें हारुनी जाय ॥२॥
dudivari dudi gaulani saten nighali | gaulani goras mhanon visarali
दुडीवरी दुडी गौळणी सातें निघाली । गौळणी गोरस म्हणों विसरली ॥१॥ गोविंदु घ्या कोनी दामोदरु घ्या गे । तंव तंव हांसती मथुरेच्या गे ॥२॥
dudh anilen paragruhinhuni | santosh nahi majhe manin | shrihari deil maj laguni | tarich dudh ghein
दुध आणिलें परगृहींहूनी । संतोष नाही माझे मनीं । श्रीहरी देईल मज लागुनी । तरीच दुध घेईन ॥१॥ पिता म्हणतां हे वचन । बाळा तूं अज्ञान । कां वर्जिलें अन्नपान । क्षुधा बहुत पीडितसे ॥२॥
dubalyansi dhan | sampadaliya nohe jatan | abhavikansi nam jan | taisha ritin
दुबळ्यांसी धन । सांपडलिया नोहे जतन । अभाविकांसी नाम जाण । तैशा रीतीं ॥१॥ धनलोभीयाचे परी । जैसें चित्त धनावरी । तैसें हृदया माझारीं । नाम जप ॥२॥
dubar bahuli vasturup jhali | pahatan sohan meli chidannand
दुबार बाहुली वस्तुरूप झाली । पाहतां सोहं मेळी चिदांनंद ॥१॥ अधमात्रा स्थान नयनींच प्रमाण । मसुरेसमान हा वर्ण जेथें ॥२॥
duravari vojhen vahilase bhar | atan verajhar khuntalise
दुरवरी वोझें वाहिलासे भार । आतां वेरझार खुंटलीसे ॥१॥ माझिया पैं मनें मानिला विश्वास । दृढभावें आस धरियेली ॥२॥
durjan to lath mari khambavarin | stambhi narahari pragatala
दुर्जन तो लाथ मारी खांबावरीं । स्तंभी नरहरी प्रगटला ॥१॥ धांवूनियां हरी आडवा तो घेतिला । ह्रुदयी विदारिला हस्तनखीं ॥२॥
durjanachen sangen durjan lagat | nana vitambit sajjanasi
दुर्जनाचें संगें दुर्जन लागत । नाना विटंबीत सज्जनासी ॥१॥ दुर्जनाचें अन्न सेउनी दुर्वास । छळिलें पांडवांस निशीमाजीं ॥२॥