भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुध आणिलें परगृहींहूनी । संतोष नाही माझे मनीं । श्रीहरी देईल मज लागुनी । तरीच दुध घेईन

dudh anilen paragruhinhuni | santosh nahi majhe manin | shrihari deil maj laguni | tarich dudh ghein

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दुध आणिलें परगृहींहूनी । संतोष नाही माझे मनीं । श्रीहरी देईल मज लागुनी । तरीच दुध घेईन ॥१॥ पिता म्हणतां हे वचन । बाळा तूं अज्ञान । कां वर्जिलें अन्नपान । क्षुधा बहुत पीडितसे ॥२॥ तंव बोले उपमन्यु । भोजन न करी दुधावांचून । श्रीहरी देईल मजलागुन तरीच भोजन करीन ॥३॥ देवा त्वां ध्रुवा अढळपद दिलें । मजलागी निष्ठुर मन केलें । एका जनार्दनीं बोले । बाल वाचे सदद ॥४॥