भजनी मालिका
← भजनांकडे परत

ॐ कार हें मुळ सर्वांचे जाणावें । तेथुनी पहावें वेदशास्त्र

om kar hen mul sarvanche janaven | tethuni pahaven vedashastra

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ॐ कार हें मुळ सर्वांचे जाणावें । तेथुनी पहावें वेदशास्त्र ॥१॥ नमन करावें कुळदैवतांसी । मातापितरांसी सर्व भावें ॥२॥ मस्तक ठेवावें संतांचे चरणीं । सदा वसो वाणी शिवनाम ॥३॥ शिव शिव ऐसें उच्चारावें मुखें । जन्ममरण दुःखें नासताती ॥४॥ वायां जाऊं देऊं नये एक क्षण । भक्तीचे लक्षण जाणावें हें ॥५॥ यमधर्म त्याचे पाय पै वंदित । एका जनार्दनीं नित्य नाम गाय ॥६॥