भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुजेपणें नको पाहुं सर्वाठायीं । एकरुप देहीं दिसे

dujepanen nako pahun sarvathayin | ekarup dehin dise

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दुजेपणें नको पाहुं सर्वाठायीं । एकरुप देहीं दिसे ॥१॥ येणें सर्व काम सुगम सोपारें । दुजेपंणे वावरे देहबुद्धी ॥२॥ मन चित्त अहंकार करणें या विचार । दुजेपणें पार केवीं तरे ॥३॥ एका जनार्दनीं दुजेपणा सांडी । विठ्ठलचि मांडी हृदयामाजीं ॥४॥