भजनी मालिका
← भजनांकडे परत

दीपकळिकेमाजीं कळा । तैसा परब्रह्मा पुतळा

dipakalikemajin kala | taisa parabrahma putala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दीपकळिकेमाजीं कळा । तैसा परब्रह्मा पुतळा ॥१॥ असोनियां नसे जगीं । जैसा प्राणवायु संगीं ॥२॥ करवी खेळवी नाना खेळा । परी आपण अलिप्त सकळां ॥३॥ एका जनार्दनीं सुत्रधारी । खेळ खेळोनी अलिप्त निर्धारी ॥४॥