भजनी मालिका
← भजनांकडे परत

दीपांचें तें तेज कळिकें ग्रासिले । उदय अस्त ठेले प्रभेविण

dipanchen ten tej kaliken grasile | uday asta thele prabhevin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दीपांचें तें तेज कळिकें ग्रासिले । उदय अस्त ठेले प्रभेविण ॥१॥ लोपलीसे प्रभा तेजाचे तेजस । जाहली समरस दीपज्योती ॥२॥ फुंकिल्यावांचुनीं तेज तें निघालें । त्रिभुवनीं प्रकाशिलें नवल देख ॥३॥ एका जनार्दनीं ज्योतीचा प्रकाश । जाहला समरस देहीं देव ॥४॥