भजनी मालिका
← भजनांकडे परत

दीपकाचे ठायीं नाहीं द्वैतभाव । चोर आणि साव सारखाची

dipakache thayin nahin dvaitabhav | chor ani sav sarakhachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
दीपकाचे ठायीं नाहीं द्वैतभाव । चोर आणि साव सारखाची ॥१॥ तैसं ब्रह्माज्ञान । सांगताती गोष्टी । अभाविका पोटीं स्थिर नोहे ॥२॥ शुद्ध पंचामृतें काग तो न्हाणिला । परी कृष्णवर्ण पालटला नोहे त्याचा ॥३॥ एका जनार्दनीं खळाचा स्वभाव । पालट वैभव नोहे त्यासी ॥४॥